नाशिक जिल्हा प्रशासनाकडून सन २०२६ साठी 'स्थानिक सुट्या' जाहीर...

Share:
Last updated: 10-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० फेब्रुवारी - नाशिक जिल्ह्यातील शासकीय आणि निमशाशाकीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नाशिक जिल्ह्यासाठी सन २०२६ या वर्षातील तीन स्थानिक सुट्या प्रशासनाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाचे अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) अरविंद लोखंडे यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे.
विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आलेल्या या सुट्यांचे नियोजन प्रामुख्याने सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे.

या दिवशी राहतील सुट्या:
जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना खालील तीन दिवशी सुट्टी लागू असेल:
रक्षाबंधन: २८ ऑगस्ट २०२६ (शुक्रवार)
अनंत चतुर्दशी: २५ सप्टेंबर २०२६ (शुक्रवार)
धनत्रयोदशी: ६ नोव्हेंबर २०२६ (शुक्रवार)

महत्वाची टिप:
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या स्थानिक सुट्या नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील; मात्र न्यायालयीन विभागासाठी या सुट्या लागू नसतील.
या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून, सलग येणाऱ्या सुट्यांमुळे पर्यटनालाही चालना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.